ड्रग्ज तस्करी प्रकरणी आरोपी ललित पाटीलने पोलिसांना चकवा दिला आहे. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र तो रुग्णालयातून पळून गेल्यामुळे पोलिसांनी तो हिसका देऊन पळून गेल्याच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ललित पाटील ड्रगमाफिया (drug mafia lalit patil) आधीच येरवडा कारागृहात (yerawada jail) अटकेत होता. त्यानंतर विविध आजाराचे कारण सांगून गेल्या चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता.
पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयाच्या (sassoon hospital) प्रवेशद्वारावर रविवारी २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून २ आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी ललित पाटील आणि त्याच्या सोबत गुन्ह्यात (Crime) सामील असलेले आरोपी यांचे हाय प्रोफाईल रॅकेट असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. ललित पाटील या गुन्ह्याआधीच येरवडा कारागृहात होता, मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णलयाच्या गेटवरून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफेड्रोन ड्रग जप्त केले होते. या ड्रगची किंमत तब्बल २ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती तसेच रुग्णालयात असूनही त्याने रॅकेट कसे चालवले याविषयी पोलिसांचा शोध सुरू असतानाच ड्रगमाफिया ललिल पटेल रुग्णालयातून पळाला.
(हेही वाचा – Ujani Dam : परतीच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल, जलसंपदा विभागाची माहिती )
तो पळून गेल्याचं दृष्य २ सीसीटीव्ही (cctv footage) कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यामध्ये तो पळत नाही, तर रुग्णालयातून बाहेर पडून शांत, निवांतपणे चालत गेल्याचे दिसत आहे. त्याचा कोणीही पाठलाग करत नाहीए, मात्र पोलिसांनी त्याला एक्सरे काढण्यासाठी नेले असताना तो हिसका देऊन पळून गेल्याचा दावा केला आहे, पोलिसांच्या या दाव्यावर (police statement) आता शंका निर्माण होत आहे.
ललित पाटील हा ड्रगमाफिया गेल्या चार महिन्यांपासून उपचाराचे कारण देऊन ससून रुग्णालयात होता. यादरम्यान त्याच्यावर नेमके कोणते उपचार झाले. याविषयी कारागृह प्रशासन, रुग्णालय डीन यांच्याकडून कोणीही माहिती देऊ शकलेले नाही शिवाय ज्या वॉर्डमध्ये आरोपींना उपचाराकरिता दाखल केलेले असते, त्याबाहेर पोलिसांचा पहारा असतो. यापैकी एखाद्या आरोपीला उपचारासाठी नेताना पोलीस सोबत असतात. तरीही तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्यामुळे येरवडा कारागृहाने त्याच्या आजारपणाविषयी दिलेला अहवाल आणि रुग्णालय व्यवस्थापनाबाबत संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाबाबत रुग्णालय अधिकाऱ्यांची काही मदत ड्रग माफिया ललिल पाटीलला मिळाली होती का याचाही शोध घेतला जात आहे याशिवाय या प्रकरणी ९ पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे.