विनापरवाना व्यवसाय करणा-या कारखान्यावर FDA चा छापा; 800 किलो बनावट पनीर जप्त

पुण्यातील वानवडी येथील बनावट पनीर तयार करणा-या कारखान्यावर एफडीएने कारवाई केली आहे. मे. टिपटाॅप डेअरी प्राॅडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणा-या कारखान्यावर एफडीएने छापा टाकला आहे. या छाप्यात 800 किलो बनावट पनीर तयार करुन ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 270 किलो पामोलिन तेल साठवल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 67 हजार 790 रुपये किमतीचे 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रुपये किमतीचे 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रुपये किमतीचे 268 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करुन नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.

मागच्या 15 दिवसांतली पुण्यातली ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची तिसरी मोठी कारवाई आहे. कोंढवा भागात असणा-या सद्गुरुकृपा मिल्क अॅंड मिल्क प्राॅडक्ट्स या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत जवळपास 1 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 22 लाखांचे सामान जप्त करण्यात आले आहे.

( हेही वाचा: वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार! हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावरच सांगितली मालकी )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here