पुण्यातील (Pune Fire) जुना बाजार ( Juna Bazar) येथे असलेल्या दुकानांना मोठी (Fire at Shop) आग लागली आहे. मंगळवार पेठेत ( Mangalwar Peth) असलेल्या या जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानांना बुधवारी सकाळी अचानक आग लागली. अग्नीशमन दलाच्या( Fire Brigade) 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
( हेही वाचा: Union Budget 2023 : बजेटमधून रेल्वेला काय मिळणार? ‘या’ घोषणा होण्याची शक्यता )
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील 7 ते 8 दुकानांना बुधवारी सकाळी आग लागली. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकाने आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
Join Our WhatsApp Community