पुण्यातील जुना बाजार येथील दुकानांना मोठी आग

पुण्यातील (Pune Fire) जुना बाजार ( Juna Bazar) येथे असलेल्या दुकानांना मोठी (Fire at Shop) आग लागली आहे. मंगळवार पेठेत ( Mangalwar Peth) असलेल्या या जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानांना बुधवारी सकाळी अचानक आग लागली. अग्नीशमन दलाच्या( Fire Brigade) 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

( हेही वाचा: Union Budget 2023 : बजेटमधून रेल्वेला काय मिळणार? ‘या’ घोषणा होण्याची शक्यता )

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील 7 ते 8 दुकानांना बुधवारी सकाळी आग लागली. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकाने आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here