शुक्रवार ५ मे रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास वाघोली, उबाळे नगर येथे “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग (Pune Fire) लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला असून अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुणे शहर (Pune Fire) ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते.
(हेही वाचा – Thane Fire : उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग)
वाघोलीत तीन जणांचा मृत्यू
शुभ सजावट या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग (Pune Fire) लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीएची ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
गोदामात लग्न समारंभ व सजावट, लायटिंग, वायर, कुशन, कारपेट जास्त असल्याने तसेच पेंटिंगचे काम सुरू असल्यामुळे आगीची तीव्रता भीषण होती, आजू बाजूला असलेल्या गोडाऊन मधून चार इ-रिक्षा बाहेर काढण्यात आल्या , गोडाऊनच्या पाठीमागे असलेल्या इंडेन गॅस (सुमारे ४०० सिलेंडर) गोडाऊनला सुरक्षित करण्यात आले. तसेच तेथील रहिवाशी इमारतींना आगीची झळ पोहोचू नये याची दक्षता घेत रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले. पीएमआरडीए अग्निशामक दल व पुणे महापालिका मिळून ०९ अग्निशमन वाहनांनी ४५ अग्निशमन जवानांनच्या साह्याने आग आटोक्यात आणली.
हेही पहा –
काय म्हणाले अधिकारी?
आगीसंदर्भात बोलताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Pune Fire) अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच ४०० सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.”
Join Our WhatsApp Community