Pune Fire Case: पुण्यातील कात्रजमध्ये अग्नीतांडव, EV गाड्यांच्या गोदामाला आग; 150 निर्माणाधीन दुचाकी भस्म

188

Pune Fire Case : पुणे शहरातील कात्रज परिसरात इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. त्यात निर्माणाधीन १५० दुचाकी जळाल्या. तर अग्निशमन दलाचे (fire brigade) अधिकारी आग लागल्याच्या कारणाचा शोध घेत आहेत. तसेच या आगीमध्ये कोणीही जखमी नाही, तर अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. (Pune Fire Case)

मिळालेल्या माहितीनुसार कात्रज-गुजरवाडी रस्त्यावर (Katraj-Gujarwadi road) साई इंडस्ट्रिअल इस्टेट (Sai Industrial Estate) हा औद्याेगिक परिसर आहे. येथे भूषण एंटरप्रायजेस नावाची इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी कंपनी आहे. येथे सुमारे दाेन हजार इलेक्ट्रिक दुचाकीचे साहित्यही ठेवण्यात आले होते. तेथे आग लागल्याने कंपनीत माेठी धावपळ उडाली आणि भयभीत झालेले कंपनीतील कामगार तातडीने बाहेर पळाल्याने पुढील अनर्थ टळला.

तसेच या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे गंगाधाम, कात्रज, काेंढवा बुद्रुक, पीएमआरडीए येथील सहा बंब आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीत वाहनांचे सुटे भाग, बॅटरी, तसेच अन्य साहित्य जळून काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.

(हेही वाचा – BMC : नालेसफाईत कंत्राटदारांचे कार्टेलिंग; संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला?)

सुरक्षेचा प्रश्न…
या ठिकाणी आग लागल्यामुळे असणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंधरा हजार चौरस फुटांमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही उत्पादन करणारी कंपनी आहे. दुचाकीचे सुटे स्पेअर पार्ट (Spare part) या ठिकाणी होते. मोठ्या प्रमाणात बॅटरीज (battery) व टायर, तसेच बाइक बनवण्याचे इतर साहित्य होते. दुपारी या कंपनीमध्ये ई-बाइक्स (E-bikes) ठेवण्यासाठी आतमध्ये पत्र्याचे स्लॅब बनवण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंपनीमध्ये आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही सक्षम अशी यंत्रणा नसल्याने आग मोठ्या प्रमाणात लागली. त्यामुळे फायर यंत्रणा कंपनीत का ठेवण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.