Pune Fire : गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे २२ बंब घटनास्थळी दाखल

पुणे व पीएमआरडीए येथे मिळून एकुण २२ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

258
Pune Fire : गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे २२ बंब घटनास्थळी दाखल

पुण्यातील गंगाधाम चौकाच्या परिसरात असलेल्या गोदामाला रविवार १८ जून रोजी पहाटे भीषण आग (Pune Fire) लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. ही आग इतकी भीषण आहे की, यामुळे हवेत दूरवर धुराचे लोट पसरले आहेत.

गंगाधाम चौकाच्या परिसरात विविध प्रकाराच्या मालाचे गोदाम आहेत. जसे की बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग साहित्य व इतर. यामधील सदर आग (Pune Fire) ही सिमेंट व बिस्किट मालाच्या गोदामाला लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – Central Railway : लोकल रुळावरून घसरल्याने कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत)

मिळालेल्या माहितीनुसार ही आग (Pune Fire) गंगाधाम चौकापुढे, आईमाता मंदिराजवळ सुमारे २० विविध साहित्याच्या गोदामाला देखील लागली आहे. त्यामुळे आता पुणे व पीएमआरडीए येथे मिळून एकुण २२ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुदैवाने अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तसेच गंगाधाम चौकाच्या आसपास वस्ती आहे. त्यामुळे गोदामाला आग (Pune Fire) लागल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, या आगीमध्ये एकूण किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.