गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune Fire) सतत कुठे ना कुठेतरी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातल्या टिंबर मार्केटमधील लाकडाच्या (Pune Fire) गोदामाला पहाटे 4.14 च्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही आग अद्याप सुरूच आहे. ही आग (Pune Fire) एवढी भीषण आहे की, शेजारील चार घरांनाही आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या (Pune Fire) तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
(हेही वाचा – Helmet : ‘या’ जिल्ह्यात हेल्मेट घातले नाही तर होतो १ हजार रुपये दंड )
आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग (Pune Fire) खूपच भीषण असल्यामुळे शेजारील 4 घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
हेही पहा –
अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी आग (Pune Fire) आणखी पसरु नये यासाठी दक्षता घेतली. आधीच शेजारील चार घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दक्षता घेत इतर घरं आणि बाजूलाच असलेली शाळा यामध्ये आग पसरू दिली नाही. तसेच, वस्तीमध्ये असलेले 10 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग (Pune Fire) विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीत कोणीही होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
Join Our WhatsApp Community