मागच्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune Fire) सतत कुठे ना कुठेतरी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता मार्केटयार्ड मधील एका रद्दीच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आगसोमवार २९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लागली. रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मार्केट यार्ड परिसरात सर्वदूर धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
(हेही वाचा – Pune Fire : टिंबर मार्केटमधील लाकडाच्या गोदामाला लागली भीषण आग; अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल)
जवानांनी तातडीने गोदामाच्या मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साहय्याने कुलूप तोडत चारही बाजुंनी पाण्याचा मारा केला. गोदामामध्ये कोणीही नागरिक अडकला नसल्याची माहिती घेत त्यांनी पाण्याचा मारा सुरु केला. आग (Pune Fire) पसरु नये, याची जवानांनी काळजी घेतली आणि तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोदामामध्ये असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोदामामध्ये असलेले दोन टेम्पो ही जळाले. मात्र अद्याप या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
मार्केड यार्ड परिसरात पुण्यातील मोठी (Pune Fire) बाजारपेठ आहे. तिथे अनेक गोदाम देखील आहेत. सगळेच गोदाम एकमेकांना लागून असल्याने आगीची घटना घडली की आग पसरण्याचा मोठा धोका असतो.
Join Our WhatsApp Community