महावितरणच्या राज्यभरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या नियोजनातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे नुकताच कार्यान्वित झाला आहे. महावितरणच्या प्रकाश भवनाच्या छतावर ६० किलोवॅटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे त्याच ठिकाणी असलेल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. (PUNE)
या प्रकल्पातून दरमहा सुमारे ७ हजार २०० युनिट विजेची निर्मिती होणार असून, त्याद्वारे चार्जिंग स्टेशनला पुरवठा सुरु करण्यात आला आहे. गणेशखिंड येथील प्रकाश भवनाच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तेथील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरू करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. (PUNE)
(हेही वाचा – मी पळणारा नाही तर लढणारा; नव्याने पेरणी करणार; Devendra Fadnavis यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले आश्वस्थ)
केंद्रीय नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव दिनेश जगदाळे व संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या वेळी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा) पंकज तगलपल्लेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. (PUNE)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community