Pune Flood : पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांचे पुनर्वसन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

158
Pune Flood : पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांचे पुनर्वसन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात नुकतीच आलेली पूर (Pune Flood) परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (३ ऑगस्ट) दिले.

शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पुण्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. एकतानगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे तीन लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत, अशी माहिती पालिका आयुक्तांनी बैठकीत दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यावेळी शिंदे यांनी याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे. तसेच तसा आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले. (Pune Flood)

(हेही वाचा – Sarvajanik Ganeshotsav : मंडळांच्या मंडप परवानगीबाबत समन्वय समिती नाखूश)

जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडताना पुरेशी सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली. तसेच पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी यावेळी पूर परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने केलेल्या मदत आणि बचाव कार्याविषयी सांगितले. धरण क्षेत्रात मोठा पाउस झाल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या भागात पुराचा (Pune Flood) धोका होऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पात पूर संरक्षकाचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पूर परिस्थितीत पुण्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण नियमांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचना केल्या. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना विविध संस्थांकडून मदत करण्यात येत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पुरेसे अन्नधान्य असलेले संच पूरग्रस्त एकतानगर, सिंहगड येथील गोरगरीब नागरिकांना पुरवावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Pune Flood)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.