सिंहगड ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार?

112

पुणे शहरात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. तसेच घाट माथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गावर खडक कोसळण्याच्या भितीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे. त्यात सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती या पत्रातून केली आहे.

तात्पुरती बंदी आवश्यक

पुणे वनविभागाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घाट परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आम्ही अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची विनंती वनविभागाकडून करण्यात आली आहे.

( हेही वाचा : Oppo कंपनी DRI च्या रडारवर! 4,389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकवले)

पर्यटकांनीही स्वत:ची सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे, सेल्फी काढण्यासाठी अनेक लोक धोकादायक ठिकाणी उभे असतात अशावेळी सावध राहणे गरजेचे आहे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.