‘या’ प्रवाशांना करता येणार PMPML मधून मोफत प्रवास; जाणून घ्या सविस्तर

पीएमपीएमएलची ग्रामीण भागातील सेवा काही दिवसांमध्ये बंद केली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा पीएमपी प्रवास आणखी सुखद होणार आहे. यातच पीएमपी (PMPML) ने 40 रुपयांत दिवसभर फिरा ही योजना सुरु केल्याने अनेकांचे पैसे वाचणार आहेत. शहरभर फिरण्यासाठी आता केवळ 40 रुपये लागणार आहेत. ही सुविधा एका दिवसासाठी असणार आहे. त्यातही काही व्यक्तींना पीएमपीएमने मोफत प्रवास करता येणार आहे.

या व्यक्तींना मिळतो मोफत प्रवास

  • पीएमपीने प्रवास करण्यासाठी काही विशेष व्यक्तींना मुभा दिली जाते.
  • दिव्यांग आणि विशेष व्यक्ती ( वर्षभराचा पासदेखील मोफत)
  • वार्ताहर ( वर्षभराचा पास मोफत)
  • स्वातंत्र्य सैनिक
  • केंद्र व राज्य शासनाने विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती
  • दुर्धर आजार असलेले व्यक्ती

( हेही वाचा: मी कोण आहे माहिती आहे का? म्हणत.. PMPML बसच्या ड्रायव्हरला तरुणाकडून मारहाण )

ग्रामीण भागातील बस सेवा होणार बंद

पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील ४० मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला एसटीची सेवा सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. एसटी सेवा नियमित झाल्यावर पीएमपी सेवा बंद होणार असल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here