Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?

116
Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?

पुण्यात गणपती विसर्जन (Pune Ganpati Visarjan) मिरवणुकीची तयारी सुरु झाली आहे. सोहळ्यासाठी १७ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणेच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी येत असतात. गर्दी वाढणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

(हेही वाचा-Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)

शिवाय, विसर्जन मिरवणूक पाहायला येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था पोलिसांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने लक्ष्मी रोड, टिळक रोड सह शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. (Pune Ganpati Visarjan)

(हेही वाचा-Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदलणार, काय आहे नवीन नाव?)

सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद राहणार आहेत. शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद असतील. पुण्यात सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. (Pune Ganpati Visarjan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.