गणेश चतुर्थी ते गणेश विसर्जन असा दहा दिवसाचा गणेशोत्सव (Pune Ganpati Visarjan 2023) सर्वांसाठी महत्वाचा आणि उत्साहाचा सोहळा आहे. आज ढोल ताशा आणि वाद्यांच्या गजरात नाचत गाजत आज बाप्पाचं विसर्जन होत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात गणपती बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणताना पाणी येतं. लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र काही भुरटे याचाच गैरफायदा घेतात. याचाच फायदा उचलत काही भुरटे या मिरवणुकांच्या माध्यमातून गैरप्रकार करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे मिरवणुकांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातू मिरवणुकीकडे लक्ष ठेवलं जाणार आहे.
सुमारे नऊ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात (Pune Ganpati Visarjan 2023) करण्यात आले आहेत. शहरात घातपात घडविण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली.
(हेही वाचा – Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत जाताय तर खबरदार)
त्यांचा एक साक्षीदार (Pune Ganpati Visarjan 2023) अद्याप फरारी असून त्याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जास्त खबरदारी घेतली आहे. प्रमुख मिरवणूक मार्गांवर २०५ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तालय आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
साध्या वेशातही पोलिस
मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या पोलिसांचा (Pune Ganpati Visarjan 2023) बंदोबस्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेतील सहायक आयुक्त-१ सुनील तांबे आणि सहायक आयुक्त-२ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युनिट आणि पथकांकडून सराईत गुन्हेगार आणि चोरट्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community