पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Pune GBS) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज (29 जाने.) नव्याने ४ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १११ रुग्ण आढळलेत. नव्याने दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एकावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. जीबीएस रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहेत. (Pune GBS)
हेही वाचा-Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका
पुण्यातील विहिरीच्या पाण्यात क्लोरिन (Chlorine) टाकणं आणि त्याचं प्रमाण मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा बसवली जाणार आहे. पुण्यातील वाढत्या जी बी एस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कार्यरत होणार आहे. पुण्यातील सिंहगड रोड तसेच नांदेड सिटी भागात असलेल्या विहिरींवर हे मिटर लावण्यात येणार आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणाची माहिती आता प्रशासनाला तात्काळ मिळणार आहे. पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे.(Pune GBS)
हेही वाचा-Pandharpur : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार ; मंदिर समितीचे अनेक ऐतिहासिक निर्णय
दरम्यान, GBS मुळे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने (central government) आज सात तज्ज्ञांच पथक पुण्यात पाठवलं. या केंद्रीय पथकाला आज पुण्याच्या नांदेड गावात गावकऱ्यांनी घेराव घातला. गावकऱ्यांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. हे केंद्रीय पथक विहिरीची, पाण्याची पाहणी न करताच परतत होतं, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांभोवती गराडा घातला. पाहणी करायला आलात, पण पाहणी न करताच निघालात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. (Pune GBS)
हेही वाचा-Supreme Court : स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; कारण काय?
त्यावर महिला अधिकाऱ्याने सांगितलं की, “पाहणी न करता निघालो हे कोणी ठरवलं. जे काही काम होईल, त्याचे अपडेट देऊ” पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात GBS आजारचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या आजारावर उपयुक्त असलेल्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याने पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या आहेत. (Pune GBS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community