या शहरातील कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या पुढे

95

राज्यात ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णसंख्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरातील रुग्णसंख्या वाढू लागली होती. आठवड्याच्या शेवटला रुग्णसंख्या थोडी नियंत्रणात येत असताना, रविवारी पुण्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीने थेट ३१० पर्यंतची संख्या गाठली. राज्यातही आता १ हजार ५१८ कोरोना रुग्णांवर विविध भागांत उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.

अशी आहे स्थिती

रविवारी पुण्यात कोरोनाचे 29 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांमुळे शनिवारपर्यंत २८१ पर्यंत पोहोचलेली कोरोनाची रुग्णसंख्या आता रविवारी ३१० पर्यंत पोहोचली. मात्र पुण्यातील रुग्णवाढीचा दर त्या तुलनेने कमी असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी केला आहे.

आठवड्याच्या शेवटी रुग्णसंख्येत वाढ

९ मे पासून पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. सोमवारीच पुण्यातील एकूण रुग्णसंख्या २८५ पर्यंत पोहोचली होती. दुस-या दिवशी हीच संख्या २९२ पर्यंत वाढली. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू कमी होत असल्याचे दिसून आले होते. बुधवारनंतर रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. मात्र आठवड्याच्या शेवटी पुन्हा कोरोना रुग्ण तिनशेच्या घराजवळ येत असल्याचे दिसून आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.