पुण्यात तीन ठिकाणी पावसाचे पाणी साचले; हडपसर भागात झाड कोसळले

156

मुसळधार पावसाने सोमवारी रात्री पुण्याला झोडपून काढले. शहरात तीन ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावर आकाशवाणी परिसरात झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शहरात रात्री साडेनऊच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागर नगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली. पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर आकाशवाणी केंद्राजवळ झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही. मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. तसेच, दगडू शेठ मंदिरात देखील पाणी भरले होते. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

( हेही वाचा: बांधकाम उद्योगातील कंपनीवर इडीची कारवाई; आयरो समुहाची 1300 कोटींची मालमत्ता जप्त )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.