Pune Hoarding: मुंबई पाठोपाठ पुणे मनपा अॅक्शन मोडवर

119
Pune Hoarding: मुंबई पाठोपाठ पुणे मनपा अॅक्शन मोडवर

मुंबई घाटकोपर येथील होर्डिंगबाबत (Ghatkopar Hoarding) घटना ताजी असताना पुणे महागरपालिका सुद्धा आता अॅक्शन मोडवर आली आहे. पुणे महापालिकेच्या दारातच भर रस्त्यावर सर्व नियम धाब्यावर बसवुन माेठे हाेर्डिंग उभारण्यात आले. संबंधीत होर्डिंग हे एका रात्रीत उभारण्याचा कारनामा करण्यात आला आहे. (Pune Hoarding)

ऐन वर्दळीच्या ठिकाणी पुणे महापालिकेकडून (PMC Hoarding) हाेर्डिंग उभारले जात आहे. पुणे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने या हाेर्डिंगला आणि झाडाच्या फांद्या कापण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, झाडाच्या फांद्या तोडून होर्डिंगची उभारणी करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले हाेते. त्यानंतरही चक्क महापालिकेच्याच दारात आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करून हाेर्डिंग उभारले  गेले.  (Pune Hoarding)

अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा (Dangerous Hoarding) मुद्दा ऐरणीवर असताना पालिका मुख्य इमारतीसमोरच होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देत आहे. अगोदरच पीएमपीच्या बसमुळे कायम महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर वाहनांची गर्दी असते. अशात भर रस्त्यावर पीएमपीला होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली आहे. नियमात नसतानाही अशा प्रकारे होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (Pune Hoarding)

महापालिका पीएमपी बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी येतात. ज्या ठिकाणी होर्डिंग उभे केले जात आहे तेथेच रांगेत अनेक जण बसची वाट पाहत उभे असतात. तरीही नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता महापालिकेने थेट परवानगी दिली आहे. त्यामुळे या होर्डिंगला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घाटकोपर येथे झाली होती दुर्घटना 

मुंबईत सोमवारी म्हणजेच १३ मे राजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा सुटलेल्या या वाऱ्यातच घाटकोपरमधील एक भलंमोठं होर्डिंग कोसळलं. वादळ, पाऊस सुरु झालेला, त्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. त्याचवेळी ही ह्दयद्रावक घटना घडली अन् होत्याचं नव्हतं झालं. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार अवकाळी पाऊस मुंबईवर संकट घेऊन आला. (Pune Hoarding) 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.