उन्हाळी सुट्टीच्या काळात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत रेल्वेला प्रवाशांची गर्दी असते. यामुळे या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे (PUNE) विभागातून १३२ जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या दोन महिन्यांत या १३२ गाड्यांच्या २६४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून पुणे विभागाला २१ कोटी ८७ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी ७ कोटी ७९ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र १४ कोटींचे जादा उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विशेष रेल्वे गाडीतून उत्पन्नात तीनपट वाढ झाली आहे. (PUNE)
(हेही वाचा – Smart meter पासून सर्वसामान्यांची सुटका; सरकारकडून जनआक्रोशाची दखल)
उन्हाळी सुट्टीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. यामुळे दरवर्षी या काळात गर्दी होत असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे (PUNE) विभागातून महत्त्वाच्या ठिकाणी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे पुणे स्थानकावर पाय ”ठेवायला जागा नव्हती. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी गेल्यावर्षीपेक्षा यंदा ७५ जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. तसेच मतदानासाठी स्थलांतरित कामगार गावी जाण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या काळात रेल्वेवर ताण पडत होता. तरीही प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा पुणे विभागाला महसुलाच्या माध्यमातून झाला आहे. (PUNE)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community