पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Pune International Airport) आता आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार असून, दुबई आणि बँकॉक या दोन देशांसाठी येत्या २७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामध्ये दुबईसाठी दररोज, तर बँकॉकला आठवड्यातील ३ दिवस विमान उड्डाण करणार असल्याने पुणेकरांना त्याचा फायदा होणार आहे.
(हेही वाचा – Congress ने गणपतीला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्ही गप्प का? PM Narendra Modi यांचा ठाकरेंना सवाल)
पुणे विमानतळावरील (Pune International Airport) नवीन टर्मिनल सुरू झाले आणि विमान उड्डाणांची संख्या वाढली. त्याचबरोबर पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्याबाबत प्रवाशांकडून मागणी केली जात होती. सध्या पुण्यातून दुबई आणि सिंगापूर याठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. त्यामध्ये स्पाइस जेटचे दुबईसाठी, तर सिंगापूरला आठवड्यातील ४ दिवस ही विमानसेवा सुरू आहे.
(हेही वाचा – शनिवारपासून Coastal Road सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच राहणार खुला)
आता नव्याने सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेत इंडिगो कंपनीकडून दुबईसाठी दररोज विमान उड्डाण करणार आहे, तर बँकाॅकला आठवड्यातील तीन दिवस विमान उड्डाण करणार असून, त्याची वेळापत्रक ठरविले जाणार असून, या दोन्ही विमानसेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांची मागणी आता पूर्ण होत आहे. पुण्याला दुबईसारखे महत्त्वाचे आर्थिक केंद्र थेट जोडले जात आहे. याचा निश्चितच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा होणार आहे. (Pune International Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community