Pune International Airport: पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार

68
Pune International Airport: पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार
Pune International Airport: पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ (Union Civil Aviation Minister Muralidhar Mohol) यांच्या पाठपुराव्याचे हे यश असून मनुष्यबळासंदर्भात मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली होती. (Pune International Airport)

पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत मोदी सरकारने नवे टर्मिनल साकारले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री शपथ घेतल्यानंतर लगेचच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे. (Pune International Airport)

(हेही वाचा – Hoarding Accident: होर्डिंगचा प्रश्न हा केवळ मुंबईचाच नाही तर संपूर्ण राज्याचा – आ. तांबे )

याबाबत माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले, ‘नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्य प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली आहे. ही पदे वेगवेगळ्या ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनुष्यबळ पुरवण्याची मागणी गृहविभागकडून मान्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’. (Pune International Airport)

(हेही वाचा – Criminal Laws : तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या जनजागृतीसाठी रविवारी परिषदेचे आयोजन)

मंत्री मोहोळांमुळे आली पुणे विमानतळाच्या कामांना गती !

मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात पुणे विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. यात धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला (OLS) परवानगी मिळाली तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले, या दोन्ही विषयांसदर्भात मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. आणि आता नवे टर्मिनल खुले होण्याचाहीमार्गही मोकळा झाला आहे. या तीनही प्रश्नांचा पाठपुरावा मोहोळ यांनी स्वतः केला होता. (Pune International Airport)

हेही पाहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.