Pune Rains : मॉन्सूनपूर्व पावसातच पुण्याची दाणादाण; झाडे कोसळली, रस्त्यांच्या बनल्या नद्या, वाहतुकीची कोंडी

पुणे शहर, परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरु झाला. (pune rains) मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचले.

179
Pune Rains : मॉन्सूनपूर्व पावसातच पुण्याची दाणादाण; झाडे कोसळली, रस्त्यांच्या बनल्या नद्या, वाहतुकीची कोंडी
Pune Rains : मॉन्सूनपूर्व पावसातच पुण्याची दाणादाण; झाडे कोसळली, रस्त्यांच्या बनल्या नद्या, वाहतुकीची कोंडी

मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वीच पुण्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. शहरात (Pune) अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पंधरा ठिकाणी झाडे कोसळली. डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, धानोरी, विमाननगर, सोलापूर, तसेच सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली. पाषाण, सिंहगड रस्त्यावरील इमारतीतील तळमजल्यावर पाणी साचले.

(हेही वाचा – लोकसभेत पडद्याआड पाडापाडी; विधानसभेत उघडपणे उमेदवार पाडणार… Manoj Jarange यांची दर्पोक्ती)

पुणे शहर, परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरु झाला. (pune rains) मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर पाणी साचले. पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला. शहरातील बहुंताश रस्त्यावर पाणी साचले होते. पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला.

झाडे कोसळून फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवल्या. पाषाण येथील बी. यू.भंडारी शोरुमच्या इमारतीत तळ मजल्यावर चार फूट पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपाचा वापर करून पाणी बाहेर काढले.

11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.