पुणे जिल्ह्यातील 800 शाळांमध्ये पसरला अंधार!

129

पुणे जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्या आहेत. वीज बिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यातील तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत.

792 शाळांची वीजजोडणी तोडली

पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2 हजार 847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात आहेत. शाळांचे वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल न भरल्याने 792 शाळांची वीजजोडणी तोडली आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा अंधारात आहेत.

(हेही वाचा : आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार! नारायण राणेंचा हल्लाबोल)

नाराजी व्यक्त

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शहरात 8 ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीपर्यंत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आता सुरु झाले आहेत. मात्र, 800 शाळांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्युत बिल न भरल्याने 800 शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.