पुण्यातील (Pune) लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी, ११ डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ८ या कालावधीत हा रस्ता वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामागचे कारणही तसेच खास आहे.
१०० वर्षांचा लाभला इतिहास…
सोमवारी, ११ डिसेंबरला पादचारी दिन आहे. या विशेष दिनानिमित्त हा रस्ता वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ठरवलेल्या कालावधीत पुण्यातील लक्ष्मी रस्ता वाहतूक आणि पार्किंगसाठी राहणार आहे. त्यामुळे नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विना अडथळा चालता येणार आहे. लक्ष्मी रस्त्याला १०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. त्यामुळे पादचारी दिनाचे औचित्त्य साधून हे खास आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Gambhir Sreesanth Raw : लिजंड्स चषक आयोजन समिती गंभीर-श्रीसंत वादाची चौकशी करणार )
पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येण्यासाठी अनोखा उपक्रम…
पादचाऱ्यांना विना अडथळा चालता यावे, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महामेट्रोकडून डेक्कन मेट्रो स्थानक ते महापालिका भवन स्थानकादरम्यान पादचाऱ्यांना त्यांच्या सुविधेकरिता सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच पीएमपीकडून जास्त वाहनसुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community