पुणे विमानतळ 14 दिवस बंद राहणार… हे आहे कारण

एका ठिकाणाहून कमीत-कमी वेळेत प्रवास करण्यासाठी अनेक लोक विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. पण पुण्यातील लोहगाव येथे असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 16 ऑक्टोबरपासून 14 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

काय आहे कारण?

लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरपासून 29 ऑक्टोबर पर्यंत तब्बल 14 दिवस हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 पासून या विमानतळाच्या धावपट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबर 2020 पासूनच या विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या 12 तासांसाठी प्रवासी विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती.

(हेही वाचाः फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा बंद पाडणारा सापडला! कोण आहे ‘तो’?)

परंतु येत्या 16 ऑक्टोबरपासून या कामाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होणार असल्याने या विमानतळावरील हवाई उड्डाणे ही 29 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्यातचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रवाशांना होणार त्रास

विमानतळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुण्याहून विमानमार्गे प्रवास करणा-या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्यांनी 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यानची तिकीटे आरक्षित केली आहेत त्यांना आता त्याचे पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच प्रवासासाठी आता प्रवाशांना मुंबई किंवा इतर विमानतळांचा पर्याय निवडावा लागणार आहे.

(हेही वाचाः अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here