Pune : महामेट्रोकडून दुमजली उड्डाणपुलाची तयारी

73

महामेट्रोकडून (Mahametro) वनाज ते चांदणी चौक (Pune) या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच पौड रस्त्यावर (Poud Road) कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर केला आहे. या पुलासाठी महामेट्रोकडून ८५ कोटींचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. त्यामुळे, पौड रस्त्यावर कोथरूड डेपो (Kothrud Depot) परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेने मालमत्ता कराचे लक्ष्य काठावर गाठलेच; तब्बल ६१९८ कोटी रुपयांचा कर केला वसूल)

शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून पौड रस्ता ओळखला जातो. तसेच पौड आणि पुणे- मुंबई महामार्गाकडे (Pune-Mumbai Highway) जाणारा हा शहरातील सर्वात जवळचा रस्ता आहे. परिणामी, या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते, लोहिया आयटी पार्क ते कचरा डेपोपर्यंत तीन सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने सुमारे दिड कि.मी.च्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.

ही बाब लक्षात घेवून पालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, आता महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौका पर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नळस्टाॅप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या धर्तीवर कोथरूड डेपोच्या समोरही उड्डाणपूल उभारला जाणार आहे. (Pune)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.