Pune MBA College : पुण्यामध्ये योग्य एमबीए कॉलेज कसं निवडाल?

582
Pune MBA College : पुण्यामध्ये योग्य एमबीए कॉलेज कसं निवडाल?
Pune MBA College : पुण्यामध्ये योग्य एमबीए कॉलेज कसं निवडाल?

एमबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. मात्र या अभ्यासक्रमाची योग्य दिशा, ज्ञान आणि पुरेशी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याला MBA (Pune MBA College ) करायचे असेल तर हा कोर्स करण्यासाठी किमान १२ वी पास असणे अनिवार्य आहे. मात्र, हा अभ्यासक्रम पदवीनंतरच केला जातो. पण जर एखाद्याला बारावीनंतर हा कोर्स करायचा असेल तर त्याला ५ वर्षे आणि पदवीनंतर एमबीए करायला २ वर्षे लागतात.

पुण्यातील एमबीए कॉलेजची यादी:

⦁ सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

फी: १६ लाख- २२ लाख
जागा: २८०
प्रवेश परीक्षा: एसएनएपी

⦁ पीआयबीएम

फी: ७ लाख – ३० लाख
जागा: १,१४०
प्रवेश परीक्षा: सीएटी, एमएटी, एक्सएटी, सीएमएटी

(हेही वाचा –Hemant Soren : ईडीची धास्ती : ईडीच्या कारवाईनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता)

⦁ बीआयएमएम

फी: ११ लाख
जागा: ३६०
प्रवेश परीक्षा: सीएटी, एमएटी, एक्सएटी, सीएमएटी, एमएचटी सीईटी

⦁ एनआयए

फी ९ लाख
जागा: १८०
प्रवेश परीक्षा: सीएटी आणि सीएमएटी

⦁ आयएमईडी

फी: ५ लाख
जागा: २४०
प्रवेश परीक्षा: बीएमएटी

⦁ पीयूएमबीए

फी: १ लाख- २ लाख
जागा: २४०
प्रवेश परीक्षा: सीएटी, एमएटी, एक्सएटी, सीएमएटी, एमएचए सीईटी

⦁ यूएनआय पुणे

फी: १ लाख
जागा: १९७२४
प्रवेश परीक्षा: सीएटी, एमएटी, एक्सएटी, सीएमएटी, जीएमएटी, एटीएमए, एमएचटी सीईटी

⦁ सीओईपी

फी: ३ लाख
जागा: ३०
प्रवेश परीक्षा: एमईच सीईटी

MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पाळाव्या लागतात. सर्व प्रथम MBA (Pune MBA College ) शी संबंधित सर्व अभ्यासक्रम जाणून घ्या आणि एका योग्य पर्यायाची निवड करा. अभ्यासक्रम आणि महाविद्यालयासाठी दिलेले पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा. त्याचबरोबर प्रवेश परीक्षांबद्दल जाणून घ्या आणि तुमच्या कॉलेजला मान्य असलेली परीक्षा निवडा. एमबीए प्रोग्रामसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवाराने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

अनेक विद्यापीठे तुमच्या प्रवेश परीक्षेच्या निकालांनुसार थेट प्रवेश देतात. निकाल जाहीर झाल्यानंतर, काउंसलिंगसाठी नोंदणी करा आणि प्रक्रियेचे पालन करा. आता पुढील प्रक्रिया म्हणजे काउंसलिंगमध्ये अभ्यासक्रम निवडा. नोंदणी करा आणि कागदपत्रे सबमिट करा. अशाप्रकारे तुम्ही एमबीए मध्ये प्रवेश घेऊ शकता.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.