पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय आणि पुणेकरांचा प्रवास सोयीस्कर व्हावा म्हणून लवकरच बहुचर्चित पुणे मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत.
( हेही वाचा : युक्रेनमधील ‘हे’ शहर त्वरित सोडा! भारतीय दूतावासाने दिले आदेश )
पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येणार
पीसीएमसी ते स्वारगेट ही 11.4 किलोमीटरची मार्गिका असून, त्यामध्ये 14 स्थानके असणार आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा भूमिगत मार्ग असून, यामध्ये 5 स्थानके असणार आहेत. तर वनाझ ते रामवाडी ही 15.7 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 16 स्थानके आहेत. पीसीएमसी ते फुगेवाडी या 7 किमीच्या मार्गिकेचे निरीक्षण मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी जानेवारी 2021 मध्ये केले. त्यानंतर ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यासंबंधी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
रामवाडी भुयारी मार्ग बंद
विश्रांतवाडी-कल्याणीनगर ते रामवाडीदरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने, रामवाडी भुयारी मार्ग बंद आहे. मेट्रोने भुयारी मार्गातील काम तत्काळ पूर्ण करावे. मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, अशी सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्याचे तसेच 15 मार्चपर्यंत भुयारी मार्ग मेट्रोचे काम पूर्ण होईल, असे नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले. कल्याणीनगर ते रामवाडी दरम्यान मेट्रोच्या कामांची पाहणी स्थानिक नागरिक व मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत मुळीक यांनी केली.
Join Our WhatsApp Community