धुळवडीच्या दिवशी Pune Metro ‘या’ काळासाठी राहणार बंद 

43

Pune Metro : राज्यभरात सध्या होळीचा उत्साह (Holi Festival) पाहायला मिळत आहे. गुरुवारी होळी (Holi 2025) आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी धुलिवंदन आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. याच गर्दीवर तोडगा काढण्यासाठी पुणे मेट्रोने सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुचना प्रसिद्ध केली आहे. धुळवडीच्या निमित्ताने पुणे मेट्रो विशिष्ट कालावधीसाठी (Pune metro closed) बंद करण्यात येणार आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे. (Pune Metro)

(हेही वाचा – अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा आता मराठीतून; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)

कोणत्या वेळेत मेट्रो बंद असेल ?
धुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत बंद असणार आहे. तसेच दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल, असं पुणे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.