पुणे शहराच्या मध्य भागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कोथरूड, पिंपरी-चिंचवड, रामवाडी आदी भागांतूनही नागरिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मेट्रोतून (PUNE Metro) उच्चांकी म्हणजेच सुमारे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला. दुपारपासून मेट्रोचे डबे प्रवाशांनी फुल्ल झाले होते. तर, स्थानकेही गजबजून गेली होती.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांवर मेट्रो सध्या सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल एक लाख ७५ हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. (PUNE Metro)
(हेही वाचा – Photo Exhibition : मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन)
वनाज ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांवर प्रवाशांची वाहतूक सुमारे ६० टक्के होती तर पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय, रामवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानच्या मार्गांवरही प्रवाशांची गर्दी होती. शहराच्या मध्यभागात येण्यासाठी प्रवासी शिवाजीनगर न्यायालय, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान आदी स्थानकांवर उतरत होते. शनिवारी दुपारपासूनच प्रवाशांची मेट्रोत गर्दी वाढती होती. (PUNE Metro)
उपनगरांत मेट्रो स्थानकाजवळ आपली वाहने लावून नागरिक मेट्रोने शहरात येत होते. एरवी शहरात वाहने लांबवर उभी करावी लागत. मात्र, मेट्रोमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. या पूर्वी वारीच्या दरम्यान आषाढी एकादशीच्या दिवशी मेट्रोतून सर्वाधिक म्हणजे एक लाख ९९ हजार ६०० प्रवाशांची वाहतूक झाली होती. शनिवारी हा उच्चांक मोडला, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (PUNE Metro)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community