रविवार ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले आहे. आज दुपारी ३ वाजल्यापासून पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन्ही मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू होणार आहेत. या मेट्रोचे तिकीट दर कमी असल्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सोमवार ७ मार्चपासून मेट्रो सेवा सकाळी सुरू होऊन रात्री ९ पर्यंत सुरू असेल.
( हेही वाचा : मध्य रेल्वे आता ‘या’ क्षेत्रातही आघाडीवर! )
मेट्रोचे तिकीट दर
या दोन्ही मार्गांचे कमीत-कमी तिकीट १० रुपये व जास्तीत जास्त तिकीट २० रुपये असेल. दोन्ही मार्गांवर समान तिकीट दर असणार आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोचे दर कमी असल्याचे म्हटले जात आहे.
पुणे मेट्रोविषयी अधिक माहिती
- सकाळी ७ वाजता मेट्रो सुरू होऊन, रात्री ९ वाजता बंद होईल.
- प्रत्येक मार्गावर एकूण २७ फेऱ्या होतील.
- ज्यांचे १०० तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला कार्यरत असणार आहेत व त्यांना ८ तासांची ड्युटी असेल.
- ताशी ८० किलोमीटर या वेगाने प्रवाशांना सेवा प्रदान करणा-या महामेट्रोला रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची परवानगी मिळाली आहे.
- प्रत्येक स्थानकात मेट्रो २० व गर्दी असेल तर ३० सेकंद थांबेल.
- मेट्रोच्या सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप बंद व उघडले जाणार आहेत. दरवाजा बंद झाल्याशिवाय मेट्रो सुरूच होणार नाही.
(हेही वाचाः ‘या’ कारणास्तव महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन!)
Join Our WhatsApp Community