मेट्रोचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जागतिक दर्जाची अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (सीबीटीसी) चाचण्यांना वनाज- गरवारे मार्गावरील मेट्रोमध्ये प्रारंभ झाला आहे. या सिग्नलिंग प्रणालीमुळे दर दोन मिनिटाला ट्रेन सोडणे शक्य होणार आहे. तसेच यामुळे मेट्रो ट्रेन स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे.
मेट्रो ट्रेन स्वयंचलित पद्धतीने धावणार
‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम’च्या (सीबीटीसी) प्रणाली अंतर्गत मेट्रोचे स्थान, वेग आणि इतर महत्त्वाची माहिती ट्रेनमधील कॉम्प्युटरद्वारे नियंत्रण कक्षाला मिळत राहिल. यामुळे दोन मेट्रो ट्रेन एकमेकांजवळ येणार नाहीत अथवा त्यांची धडक होणार नाही. काही कारणास्तव एखादी ट्रेन थांबली तर तिच्या मागची ट्रेन आपोआप सुरक्षित अंतर ठेऊन उभी राहील. प्रत्येक ट्रेनमध्ये एक उच्च दर्जाचा कॉम्प्युटर असेल. तो विभागीय नियंत्रण कक्षाशी तसेच इतर ट्रेनमध्ये असलेल्या कॉम्पुटरशी सतत संपर्कात असेल व ट्रेनच्या स्थानाची अचूक माहिती अद्ययावत करत राहील.
( हेही वाचा : NASA DART MISSION : पृथ्वीला लघुग्रहांपासून वाचवण्याची यशस्वी चाचणी! पहा फोटो)
या मेट्रोच्या चाचण्यांमध्ये वनाज व नळ स्टॉप या विभागांत एकाचवेळी सध्या तीन ट्रेन चालविण्यात येत आहेत. पुढच्या टप्प्यात चाचण्या पिंपरी चिंचवड- फुगेवाडी मेट्रो मार्गावर होतील. येत्या तीन महिन्यांत ही यंत्रणा दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. वनाज- गरवारे मार्गावर सध्या रोज सरासरी ८ हजार प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत.
Join Our WhatsApp Community