म्हाडाच्या पुणे महामंडळाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ४८७७ सदनिकांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने विविध कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी म्हाडाने (MHADA) या सोडतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नागरिकांना ६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. (Pune MHADA Lottery)
(हेही वाचा – …कुणी पाणी देता का पाणी; Delhi Govt ची हाक)
सध्या देण्यात आलेली मुदतवाढ ही अंतिम मुदतवाढ असल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले. या सोडतीमध्ये म्हाडा (MHADA) योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर २४१६ सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील १८, म्हाडा पीएमएवाय योजनेत ५९ सदनिका, पीएमएवाय खासगी भागीदारी योजनेत ९७८ सदनिका, २० टक्के योजनेतील पुणे शहरात ७४५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५६१ सदनिका आहेत. तसेच सोडतीचे सुधारीत वेळापत्रक हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जास्तीत जास्त अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास केलेल्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी केले. (Pune MHADA Lottery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community