Pune Mini Bus Fire case: बस मालकांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

102

Pune Mini Bus Fire case : पुण्यातील हिंजवडी (Hinjewadi) येथे १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक हादरवून सोडणारे सत्य समोर आले. ही दुर्घटना नसून एक सुनियोजित कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बसचालकानेच जळीत हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समोर आले असून, या संबंधी बस मालकाने प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Pune Mini Bus Fire case)

या प्रकरणी पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डेकर (Janardan Hambardekar) (वय ५६) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान बसचालक जनार्दन हंबर्डीकर याने हा संपूर्ण कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर आता टेम्पो मालकाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याला वेळेवर पगार दिलेला आहे. त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही, असे नितेन शाह यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

काय म्हणाले कंपनीचे मालक?
व्युमा ग्राफिक्स कंपनीचे (Vuma Graphics Company) मालक नितेन शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले, बस दुर्घटनेचा आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरु शकलो नाही. काही कर्मचारी १९८५ पासून कार्यरत होते. सर्व कर्मचारी आम्ही एका परिवारासारखे राहत होतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत करत आहोत. जनार्दन हंबर्डीकर याचा पगार थकलेला नव्हता. त्याला वेळेवर पगार दिलेला आहे. त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही. असा खुलासा मालक नितेन शाह यांनी केला.

(हेही वाचा – “संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल” ; CM Devendra Fadnavis यांची टीका)

बेंझिनची चोरी बाबत काय म्हणाले…
कंपनीतून बेंझिनची चोरी झाल्याबाबत शाह यांना प्रश्न विचारला. एक लिटर की पाच लिटर बेंझिन चोरीला गेले? असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, याबाबत मला कल्पना नाही. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरु आहे. मी अधिक काही बोलू शकत नाही. तुम्ही पोलिसांना विचारा, असे सांगत मालक नितेश शाह (Nitesh Shah) यांनी काढता पाय घेतला.

बस पेटवण्याची तयारी आधीच करून ठेवली होती!
दरम्यान, आरोपी जनार्दन हंबर्डीकर याने आदल्या दिवशीच बसमध्ये ज्वालाग्राही रसायन आणून ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. बस हिंजेवाडीजवळ येताच त्यानं चिंध्या पेटवून केमिकलमध्ये टाकल्या आणि आगीचा भडका उडाला. “सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी असते. पण आगीचा भडका इतक्या वेगाने झाला की आम्हाला संशय आला. आधीच असं कुठलं केमिकल गाडीत ठेवलं होतं का? या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला”, असं पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी नमूद केलं.

(हेही वाचा – सरसंघचालकांना उचलून मुंबईत आणा; Paramvir Singh यांनी दिलेला आदेश)

पुण्यात नेमकं काय घडलं?
बुधवारी हिंजेवाडी भागातील व्योम ग्राफिक्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारजे माळेवाडी भागातून कंपनीत नेण्यासाठी ही मिनी बस आली होती. हिंजेवाडी फेज एक परिसरात येताच मिनी बस चालू असतानाच तिनं पेट घेतला. काही क्षणांत आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याआधीच चालक व पुढच्या भागात बसलेल्या काहींनी बाहेर उड्या टाकल्या होत्या. पण मागे बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.