PUNE : पुणे शहरात तब्बल ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद

172
PUNE : पुणे शहरात तब्बल ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद

शहरात तब्बल ५५ लाखांपेक्षा जास्त वृक्षांची नोंद करण्यात आली असून शहरातील १५ वॉर्ड मध्ये ही वृक्षगणना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षगणनेसंदर्भात आदेश दिले असून, त्यानुसार महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत ही वृक्षगणना करण्यात आली. (PUNE)

जिओग्राफीक इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून प्रत्येक वृक्षाची माहिती, भौगोलिक स्थान, अक्षांश आणि रेखांश, प्रजाती, स्थानिक आणि शास्त्रीय नाव, व्यास, उंची, सद्यस्थिबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरात ५५ लाख ८१ हजार ५७८ एवढी वृक्षसंख्या नोंदविण्यात आली. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही नोंद करण्यात आली असून, शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात ७५ फमिलीज दिसतात. यात सर्वाधिक संख्या गिरीपुष्प या वृक्षांची आहे. (PUNE)

(हेही वाचा – Paris Olympic 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्यानी जग जिंकलं! नेमबाज Swapnil Kusale ला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! )

या भागातील वृक्षसंख्या चार लाखांच्या पुढे

याशिवाय दुर्मिळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली असून, त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २८३८ आहे. हे हेरिटेज ट्री सार्वजनिक ठिकाणी आहेत. साहजिकच वड हा सर्वात मोठे खोड असलेला वृक्ष म्हणून नोंदवला गेला आहे. शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा भाग असल्यामुळे तेथे वाडे-वस्त्यांचा भाग आहे. (PUNE)

त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. याशिवाय हडपसर, कोथरूड, नगररस्ता, शिवाजीनगर, औंध, बाणेर या भागातील वृक्षसंख्या चार लाखांच्या पुढे आहे. सन १९९५-९६ मध्ये पुण्यातील वृक्षसंख्या २८ लाख होती. २००७-८ मध्ये ती ३६ लाख झाली आणि आताच्या गणनेनुसार ती ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. (PUNE)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.