लष्कराची जागा ताब्यात येत नसल्याने खडकी येथील जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. अखेर या रस्त्यासाठी आवश्यक असलेली दोन किलोमीटर लांबीची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यास संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग दुपट्टीने मोठा होऊन ४२ मीटर रुंदीचा होणार असल्याने या भागातील बॉटल नेक संपणार आहे.
पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे येताना पिंपरीच्या हद्दीत एकदम मोठा रस्ता आहे, पण दापोडीनंतर मुळा नदीवरील संत तुकाराम महाराज पूल ओलांडून बोपोडीत आल्यानंतर, लहान रस्त्यामुळे कायम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
(हेही वाचा: Pegasus case: 20 जूनपर्यंत चौकशी पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)
…म्हणून रुंदीकरणाचे काम रखडले होते
गेल्या काही वर्षांत महापालिकेने स्थानिकांशी चर्चा करून थोडी थोडी करून जागा ताब्यात घेतल्याने, हा रस्ता काही प्रमाणात मोठा झाला, पण खडकीतील लष्कराची जागा ताब्यात येत नसल्याने, या रस्त्याचे रुंदीकरण ठप्प झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतून रोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावर मेट्रोचेही काम सुरू आहे. पण रस्ता मोठा नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
Join Our WhatsApp Community