सिंहगड एक्स्प्रेसमुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नोकरदारांना लेटमार्क

104

दररोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मध्य रेल्वे मुंबई-पुणे मार्गावर अनेक पॅसेंजर ट्रेन चालवते. यातील पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला मुंबईला जाताना आणि पुण्यात येताना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशीर होत असल्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. ऑफिसला उशीर होत आहे. गाडीला का उशीर होतो, हे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

( हेही वाचा : Tomato Flu : टोमॅटो फ्लूचा धोका वाढला; केंद्र सरकारने जारी केल्या सूचना)

सिंहगड एक्स्प्रेसमुळे लेटमार्क 

पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस ही मुंबईत नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच फायद्याची आहे. या गाडीतून शेकडो प्रवासी दररोज नोकरीनिमित्त मुंबईला जाण्यासाठी प्रवास करतात. पुण्यातून सिंहगड एक्स्प्रेस दररोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी निघते. ती मुंबई येथे सकाळी नऊ वाजून ५५ मिनिटांनी दाखल होणे अपेक्षित आहे; पण गेल्या काही दिवसांपासून गाडीला पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे उशीर होत आहे. त्यामुळे नोकरीसाठी मुंबईत जाणाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. या गाडीतून प्रवास करणारे बहुतांश सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. त्यामुळे ही ट्रेन तिच्या निर्धारित वेळेत मुंबईला पोहोचावी अशी या गाडीच्या दैनंदिन प्रवाशांची मागणी आहे.

मुंबईत पोहोचण्यासाठी सिंहगड एक्स्प्रेसला उशीर होतो तसाच उशीर पुण्यात जायला सुद्धा होतो. मुंबईहून ही गाडी सायंकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी निघते. ती पुण्यात ९ वाजून २५ मिनिटांनी दाखल होणे अपेक्षित आहे पण या गाडीला पुण्याल जायला १ तास उशीर होतो. त्यामुळ प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.