पुणे महापालिकेच्या ४४८ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेऊन जवळपास एक महिना होत आला असला तरी अद्याप परीक्षेच्या तारखांबाबत कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. महापालिकेने यासंदर्भात आयबीपीएस संस्थेशी विचारणा केली असून, येत्या आठवड्याभरात महापालिकेला वेळापत्रक कळविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
( हेही वाचा : Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी )
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होणार
पुणे महापालिकेत १० वर्षानंतर कायम पदभरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखेच्या १३५, यांत्रिकी शाखेच्या ५, वाहतूक नियोजन शाखेच्या ४ जागा आहेत. लिपीकाच्या २००, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या १०० आणि सहाय्यक विधी अधिकाऱ्याच्या चार अशा एकूण ४४८ जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. ही नोकर भरती महापालिकेने ‘आयबीपीएस’ या संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्यापासून ते ऑनलाइन परीक्षा घेऊन निकाल लावण्यापर्यंतची प्रक्रिया या संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात महापालिकेचा कोणताही सहभाग असणार नाही.
महापालिकेतील भरतीसाठी ८७ हजार ४७१ जणांनी अर्ज केले आहेत. येत्या आठवड्याभरात या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community