पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या पुणेकर नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण येत्या गुरूवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या भागात राहणार पाणीपुरवठा बंद
पुणे महापालिकेकडून येत्या गुरूवारी (दि. 25 ऑगस्ट) रोजी शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कामात वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर,गांधी भवन टाकी परिसर, वारजे जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, पर्वती एमएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकरजलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत व पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने पाणी बंद असणार आहे.
(हेही वाचा – 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली ; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला)
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा पाणी कमी दबाने सोडण्यात येणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community