पुणे महापालिका भरती; ‘या’ दिवशी घेण्यात येणार परीक्षा

पुणे महापालिकेतील नोकरभरतीचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदांसाठीची परीक्षा सोमवार 26 सप्टेंबरला होणार आहे. महापालिकेतील हजारो पद रिक्त आहेत, त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याने पुणे पालिकेत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

( हेही वाचा : पुण्यात घर घेणे महागणार; किमतींमध्ये ९ टक्क्यांनी वाढ)

२६ सप्टेंबरला परीक्षा 

राज्य सरकारने महापालिकेच्या पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर आता टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ४४८ पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले आहेत. सरळसेवेतून कर्मचारी नियुक्त करण्यासाठी ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेऊन कर्मचारी निवड केली जाणार आहे. भरतीच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी २६ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी तीन ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. चार ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी, तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीनंतर थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही व्यक्ती, एजंटावर विश्वास ठेवू नये, आर्थिक व्यवहार करू नयेत असे आवाहन उपायुक्त सचिन इथापे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here