Pune Municipality: पुणे – महापालिका उभारणार इको फ्रेंडली सिटी सेंटर

सिटी सेंटर प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. प्रशासकीय राजवटीत या प्रकल्पास गती आली आहे.

159
Pune Municipality: पुणे - महापालिका उभारणार इको फ्रेंडली सिटी सेंटर
Pune Municipality: पुणे - महापालिका उभारणार इको फ्रेंडली सिटी सेंटर

सिंगापूर व दुबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील 26 एकर जागेत इको फ्रेंडली व नावीन्यपूर्ण रचना असलेले सिटी सेंटर (व्यापारी संकुल) साकारण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर हा तब्बल 2 ते 3 हजार कोटी खर्चाचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी तब्बल 500 कोटी रुपये जमा होणार आहेत, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

सिटी सेंटर प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. प्रशासकीय राजवटीत या प्रकल्पास गती आली आहे. त्यासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व शहर अभियंता मकरंद निकम यांनी दुबईचा दौरा केला. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, उपअभियंता विजय भोजने; तसेच शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी नुकताच सिंगापूर दौरा केला.

(हेही वाचा – PM Awas Yojan: प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.