Pune-Nashik Expressway ला तूर्तास स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना

170
Pune-Nashik Expressway ला तूर्तास स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना

स्थानिक शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्या स्थितीत काम थांबवून महामार्गाचा फेरविचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्र्यांनी इतर पर्यायांवर विचार करण्याचा आदेश दिल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. (Pune-Nashik Expressway)

खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांतून जाणाऱ्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात (Pune-Nashik Expressway) अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. शेतकऱ्यांचा विरोध व तीव्र भावना लक्षात घेऊन सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी आमदार दिलीप मोहिते व अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अनिल वाळुंज, अशोक आदक पाटील, बाळशीराम वाळुंज, अशोक वाळुंज व अधिकारी उपस्थित होते. (Pune-Nashik Expressway)

(हेही वाचा – NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा नाही, Dharmendra Pradhan यांनी फेटाळले आरोप)

बैठकीत महामार्गाबाबत शासकीय स्तरावर सुरू असलेली प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबवून फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली. तसेच अजित पवार (DCM Ajit Pawar) व दिलीप वळसे पाटील लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करून दुसऱ्या पर्यायी मार्गाने हा रस्ता करण्याची मागणी करणार आहेत. तसे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याचे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. (Pune-Nashik Expressway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.