Pune: पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, उभारलं जाणार राष्ट्रीय स्मारक

278
Pune: पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, उभारलं जाणार राष्ट्रीय स्मारक
Pune: पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त, उभारलं जाणार राष्ट्रीय स्मारक

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे यासाठी महापालिकेत ठराव झाला होता. बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी (ता. ४) रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला हा धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. पुणे महापालिका आणि पोलिसांनी गनिमी काव्याच्या मार्गाने ही कार्यवाही करत भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.

 नंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर गेली १३ वर्षांत उच्च न्यायालयात खटला सुरू होता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची हा निर्णय कायम ठेवण्यात आला तसेच ही जागा एका महिन्याच्या आत महापालिकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जागामालक व भाडेकरूंना दिले होते.

(हेही वाचा – Raghuveer Chaudhari : गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी)

ही मुदत ३ डिसेंबरला संपल्याने महापालिकेने आज (ता. ४) पोलीस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. आज सकाळी महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिडे वाड्यातील जागा मालक व भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली. भिडेवाड्यातील भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिकादेखील आज फेटाळून लावण्यात आली आहे.

रात्री ११च्या सुमारास वाडा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. यावेळी पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील वाहतूक थांबवली. पदपथावरील पथदिवे, बोलार्ड काढण्यात आली. वाड्यावर लावलेले पोस्टर, झेंडे, दुकानांच्या पाट्या काढण्यात आल्या. वाड्यातील दुकानांचे शटर उघडून पंचनामा करण्यात आला. गॅस कटरने दुकानांचे शटर तोडण्याचे काम सुरू केले. दोन जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला वाडा पाडण्याचे काम सुरू झाले.

पोलिसांकडून भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन
” सर्वोच्च न्यायालयाची मुदत उलटून केल्याने महापालिकेने पोलिसांना भिडे वाडा ताब्यात घेण्याचे नियोजन केले. रात्री पोलिसांनी ही वास्तू ताब्यात घेऊन महापालिकेकडे हस्तांतरित केली. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडताना नियमांचे पालन करण्यात आलेले आहे. ही कार्यवाही शांततेत पार पडली.”, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.