पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हद्दीतील रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्थाचालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नौशाद शेख याची संस्था आणि त्याने बांधलेली इमारत याबाबत चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्ववादी संस्था संघटना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याप्रमाणे १६ फेब्रुवारी रोजी शेख याच्या अनधिकृत बांधकामावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई करण्यात आली, मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. ही कारवाई योग्य आहे. मात्र यामुळे आमच्या मुलांची गैरसोय होत आहे, अशी प्रतिक्रिया पालक देत आहेत. (Pune)
आम्ही कुठे जायचे? विद्यार्थ्यांसमोर प्रश्न
नौशादने केलेल्या गैरकृत्यामुळे नाहक शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षा झाली आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी निवासी केंद्रातील काही विद्यार्थ्याना बाहेर काढले. त्यानंतर विद्यार्थी आणि महापालिका कर्मचारी यांच्यात काही वेळ वाद सुरू झाला होता. अनेक विद्यार्थी अजूनही येथे राहत असल्याने आम्ही कुठे जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी पूर्ण वर्षाचे पैसे भरले असताना अर्ध्यातून कसे जायचे, पुढचे शिक्षण घ्यायचे कसे हा प्रश्न उपस्थित केला आहे.
महापालिकेने तोडगा काढावा; पालकांची अपेक्षा
एका पालकांनी सांगितले की, माझी मुलगी यावर्षी बारावीचे शिक्षण घेत आहे. मात्र अचानक या संस्थेवर कारवाई करण्यात आल्याने आता पुढे आम्ही मुलीच्या शिक्षणाचे काय करायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे. मुले अभ्यास करू शकत नाहीत. या कारवाईचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने महापालिकेने तोडगा काढावा, अशीही अपेक्षा काही पालकांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – BMC : शासन आदेश जारी; वृक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच होणार झाडांची कत्तल आणि फांद्यांची छाटणी )
शाळा चालू होती. ज्या दिवशी कारवाई झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आठवी, नववी आणि अकरावीच्या मुलांना १० दिवसांकरिता घरी जायला सांगितलं. १० दिवसांनंतर सगळं सुरळीत झालं की, तुम्ही परत या, असं सांगून त्यांना पाठवलं. १०वी आणि १२वीच्या परीक्षेचं सेंटर इकडे होतं. त्यामुळे इकडे त्या मुलांना राहणं भाग पडलं. त्यामुळे १०वी आणि १२वीची मुलं अभ्यास करत होती. त्यांचा अभ्यास आणि परीक्षा सुरू होती. पण आता कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.
हॉस्टेल व्यवस्थापनाकडून कोणताच प्रतिसाद नाही, पालकांची प्रतिक्रिया
आज जी कारवाई झाली त्यामध्ये पूर्ण बिल्डिंग रिकामी केली. पालक कुठून कसे येणार याबाबत काहीही विचार न करता अचानक कारवाई केली. पालिकेने कारवाई केली म्हणून आक्षेप नाही. जे केलं ते बरोबर आहे. पालिकेने मुलं आतमध्ये असताना कारवाई केली त्याऐवजी एक दिवस आधी नोटिस देऊन हे करता आले असते. आधीच पालकांना मुलांना घेऊन जा, असे सांगितले असते तर सगळ्यांची धावपळ झाली नसती. नौशादला अटक झाली त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या मिटिंगमध्ये काळजी करू नका, आता आम्ही कारवाई करणार नाही. परीक्षा झाल्यावर आम्ही जे काही करायचं ते करू ‘, असे आश्वासन पोलिसांनी दिले होते, मात्र तरीही ही कारवाई आता झालेली आहे. ही कारवाई दुपारी सुरू झाली तेव्हा मुलं अभ्यास करत होती. इमारतीतलं कार्यालय, मेस जमीनदोस्त केली आहे तसेच पाणी आणि इलेक्ट्रिसिटी बंद केलं आहे. अशा परिस्थितीत मुलं तिथे राहू शकत नाहीत. इतके होऊनही हॉस्टेल व्यवस्थापनाकडून कोणताच प्रतिसाद आम्हाला मिळत नाही.
- निखिल पराडकर, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीचे पालक.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community