पुण्यात रिक्षा प्रवास महागला!

127

पुणे जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान भाडेदर सद्या २१ रूपये आहे. परंतु यात सुधारणा करून आता भाडेदर २३ रूपये करण्यात आले आहेत. त्यापुढील प्रत्येक किमीसाठी भाडे १४ रूपयावरून १५ रूपये करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली. विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. यामुळे ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

रिक्षा प्रवास महागला!

सुधारित केलेल्या भाडेदरावर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडेदर असणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी ४० टक्के अतिरिक्त भाडेदर आकारण्यात येणार आहे.

( हेही वाचा : CSMT स्थानकात अपघात; रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे अतिरिक्त १० बस प्रवाशांच्या सेवेत)

प्रवाशांसमवेतच्या सामानासाठी ६० X ४० सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रूपये इतके शुल्क राहणार आहे. ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलीब्रेशन) १ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे ऑटोरिक्षा चालक १ ऑगस्टपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू करण्यात येणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.