Pune News: गणेशोत्सवात पुण्यातील ‘या’ रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

105
Pune News: गणेशोत्सवात पुण्यातील 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
Pune News: गणेशोत्सवात पुण्यातील 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात (Pune News) शहरातील वाहतुककोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना मध्यभागात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, वाहन चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

गणेशोत्सवात (Ganeshotsav) नागरिकांसह वाहन चालकांनी एकमेकांना सहकार्य करून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः व्यापारी, उद्योजकांनी आपली जड वाहने शहराबाहेर अनलोड करावी. त्यानंतर छोट्या वाहनातून साहित्य मध्यभागात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Pune News)

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 5 ते 18 सप्टेंबर कालावधीत नागरिकांनी जड वाहने शहरात आणू नयेत. गणेशभक्तांसह उत्सव मंडळांना सहकार्य करून वाहतूककोंडी टाळण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे. (Pune News)

बंदी घातलेले रस्ते (Pune News)
शास्त्री रस्ता- सेनादत्त चौकी ते अलका चौक

टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चौक

कुमठेकर रस्ता- शनिपार ते अलका चौक

लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते अलका चौक

केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चौक

बाजीराव रस्ता- पुरम चौक ते गाडगीळ पुतळा

शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक

फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

सिंहगड रस्ता- राजाराम ब्रीज ते सावरकर चौक

मुदलियार रस्ता-गणेश रोड- पॉवरहाउस -दारूवाला- जिजामाता चौक- फुटका बुरूज चौक परिसरात जड वाहनांना बंदी घातली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.