Pune News : विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

68
Pune News : विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी ; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune News : विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

बारावीची परीक्षा (HSC EXAM) सुरु झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर (Education News) इंग्रजीचा होता. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ कॉपी (Copy) बहाद्दर आढळले. मात्र पहिल्याच पेपरला एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची (Pune Crime) घटना घडली आहे. (Pune News)

नेमकं काय घडलं ?
परीक्षेचा ताण आल्याने नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने पेपर सुरू झाल्यानंतर बारकोड चिटकवत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली असून, नवले हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार देण्यात आले. (Pune News)

नऱ्हे येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तो पहिल्या मजल्यावरील गॅलरीत पडला. त्यानंतर त्याने पुन्हा खाली उडी मारली. या वेळी केंद्रावर भरारी पथक होते. या प्रकारामध्ये त्याच्या हातापायाला दुखापत झाली. या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन, उपस्थित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेले. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. (Pune News)

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : देवेंद्र फडणवीस
दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (Pune News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.