पुणे रेल्वे स्थानक ( Pune railway Station) बाॅम्बने (bomb) उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकाची शनिवारी सकाळपासूनच तपासणी सुरु करण्यात आली आहे. या तपासणीनंतर रेल्वे स्थानकामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच, पुणे स्थानकामध्ये संशयास्पद वस्तू आहे का? यासंदर्भातील तपासणी केली जात आहे. तसेच, प्रवाशांच्या सामानाचीदेखील तपासणी केली जात आहे.
( हेही वाचा: घराघरांत वापरले जाणारे ‘राॅकेल’ गेले तरी कुठे? )
पुणे रेल्वे स्थानकाला बाॅम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने, एकच खळबळ उडाली. एका निनावी फोनवरुन ही धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकामध्ये येणा-या प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. डाॅग स्काॅडच्या मदतीने संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी केली जात आहे. धमकीचा फोन हा मनमाड मधून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचे एक पथक मनमाडला पकडण्यासाठी रवाना झाले आहे.
Join Our WhatsApp Community