Pune News : उजनी धरण ९० टक्क्यांवर; भीमा-सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

209
Pune News : उजनी धरण ९० टक्क्यांवर; भीमा-सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune News : उजनी धरण ९० टक्क्यांवर; भीमा-सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण (Pune News) 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होते. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 90 टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 110 टीएमसी इतका झाला आहे. धरणात सध्या दौंडवरुन 75 हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे आता धरणातून (Ujani Dam) डावा- उजवा कॅनॉल, बार्शी, दहीगाव उपसा सिंचन योजना, बोगदा, सीना नदीतून पाणी सोडले जाणार आहे. विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

(हेही वाचा –MP wall collapse: मध्यप्रदेशात भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू)

भीमा, सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 46 टीएमसीपर्यंत (90 टक्क्यांपर्यंत) पोचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे.पण, पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100 टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सद्य:स्थिती आहे. सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे, तेवढा आलेला आहे. (Pune News)

(हेही वाचा –Waqf Board चे अधिकार कमी होणार ? मोदी सरकार मांडणार विधेयक)

दरम्यान, उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळींब, ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 62 हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे. आता धरणातून खाली पाणी सोडले जाणार आहे. पुण्यातील मुसळधार पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून 2 महिने असल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे. नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढविण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाणे गरजेचे आहे. (Pune News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.